पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वाकड ते किवळे या मार्गावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत सुरू असलेल्या सर्विस रोड व ग्रेड सेपरेटर संदर्भातील कामांना तातडीने गती देण्यात यावी, तसेच परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आवश्यक ती पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर व नगरसेविका श्रुती राम वाकडकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी संजय कदम, प्रोजेक्ट डायरेक्टर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
१. भूमकर वस्ती येथील रस्त्याची सध्याची रुंदी ४५ मीटर असून, प्रस्तावित ग्रेड सेपरेटरची रुंदी देखील ४५ मीटर इतकीच करण्यात यावी. यामुळे निर्माण होणारा ‘बॉटलनेक’ टाळता येऊन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
२. ताथवडे व पुनावळे येथील सध्या कार्यरत ग्रेड सेपरेटर वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत अपुरे पडत आहेत. त्यामुळे ते रस्त्याच्या एकूण रुंदीप्रमाणे विस्तारित करण्यात यावेत.
३. वाढत्या वाहतूक भाराचा विचार करून पुढील ठिकाणी नवीन ग्रेड सेपरेटर उभारण्यास मान्यता देण्यात यावी
• पवना नदी ते पुनावळे दरम्यान – १ नवीन ग्रेड सेपरेटर
• पुनावळे ते ताथवडे दरम्यान – २ नवीन ग्रेड सेपरेटर
• ताथवडे ते वाकड दरम्यान – २ नवीन ग्रेड सेपरेटर
• वाकड भूमकर वस्ती ते वाकड भुजबळ वस्ती दरम्यान – १ नवीन ग्रेड सेपरेटर
अशा एकूण ६ नवीन ग्रेड सेपरेटर उभारण्यास मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, पादचारी मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयी व सुरक्षेसाठी सुरक्षित रोड क्रॉसिंग व्यवस्था (पादचारी पूल / अंडरपास / सिग्नलयुक्त क्रॉसिंग) उभारण्याबाबतही आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी राम वाकडकर म्हणाले, “वाकड–किवळे मार्गावरील वाहतूक कोंडी ही आता नागरिकांसाठी मोठी समस्या बनली आहे. दररोज हजारो नागरिकांना तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागत आहे. NHAI कडून सुरू असलेल्या कामांना अपेक्षित गती मिळत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. वाढत्या लोकसंख्येचा आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून ६ नवीन ग्रेड सेपरेटर उभारणे ही केवळ मागणी नसून गरज आहे.



















Join Our Whatsapp Group