पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १५ निगडी, प्राधिकरण, आकुर्डी गावठाण मधील नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने माजी उपमहापौर व नगरसेवक राजू मिसाळ यांनी सुरू केलेल्या हेल्पलाईन उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या हेल्पलाईनद्वारे नागरिकांना त्यांच्या तक्रारी थेट नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिक आता 6262225151 या क्रमांकावर संपर्क साधून स्ट्रीट लाईट बंद असणे, कचरा साचणे, चेंबर चोकअप, रस्त्यांवरील खड्डे व दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक रिफिक्सिंग अशा विविध नागरी समस्यांची माहिती देत आहेत. प्राप्त तक्रारींवर तत्काळ संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही केली जात आहे.

या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत झाला असून समस्यांचे जलद निराकरण होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनापर्यंत नागरिकांचा आवाज प्रभावीपणे पोहोचवण्याचे माध्यम म्हणून ही हेल्पलाईन सिद्ध होत आहे.
“नागरिकांची समस्या म्हणजेच आमची जबाबदारी,” असे मत व्यक्त करत राजू मिसाळ यांनी सांगितले की, प्रभागातील प्रत्येक नागरिकाला त्वरित प्रतिसाद देणे हेच आपले प्राधान्य आहे. भविष्यातही हा उपक्रम अधिक सक्षम आणि परिणामकारकपणे राबविण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



















Join Our Whatsapp Group