६२ हजारांहून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; ६ कोटी ७६ लाख ३० हजारांचा दंड वसूल
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने मे २०२६ या महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोठी मोहीम राबवत तब्बल ६२ हजार ७२७ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून सुमारे ६ कोटी ७६ लाख ३० हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक, व्यापारी आणि आयटी क्षेत्राचे प्रमुख केंद्र असल्याने येथे वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याने वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत ही विशेष कारवाई करण्यात आली.

या कारवाई दरम्यान विविध नियमभंगांवर खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली..
नंबर प्लेट नियमभंग – ५,४७५
डेंजर ड्रायव्हिंग – २८४
मोबाईलवर बोलत वाहन चालवणे – १,९९३
सिग्नल जंपिंग – ८,४८३
ट्रिपल सीट – ६,५३९
मद्यप्राशन करून वाहन चालवणे (ड्रंक अँड ड्राईव्ह) – ४०२
जड अवजड वाहनांवरील कारवाई – ८,१४२
काळी काच – ३,०९०
मॉडिफाईड सायलेंसर – १,०३२
राँग साईड वाहनचालक – २३९
बसेसवरील कारवाई – ३,४९०
रिक्षांवरील कारवाई – ३,१०२
विनापरवाना वाहनचालक – ८७०
टोईंग कारवाई – ११,५८०
वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे/नो पार्किंग – १९,३४०
परवाना निलंबन प्रस्ताव – १६६
हेल्मेट कारवाई – ४२९
या मोहिमेतून नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा दंडात्मक तसेच न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group