पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष व माजी अतिरिक्त आयुक्त रोहीदास कोंडे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. रोहीदास कोंडे यांच्यासारखे प्रशासक उत्कष्ट क्रिडापटू निर्माण करू शकतो आणि समाजाच्या उत्कर्षामध्ये भरीव योगदान देऊ शकतात आणि आदर्श निर्माण करू शकतात, असे गौरवोद्गार मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले.

असोसिएशन तर्फे आयोजित हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी सचिव रियाझ बागवान, अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, सहसचिव डॉ. दिलीपसिंह मोहीत, खजिनदार संजय शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. मानपत्र, पुणेरी पगडी, श्री गणेशाची मुर्ती, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात क्रीडा संस्कृती रूजविण्याचे चांगले काम कोंडे साहेबांनी केले. तसेच शिस्तबध्द व उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. शहरातील खेळाडूंना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होती, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याशिवाय पिंपरी चिंचवड शहरात क्रिकेट असोसिएशन याव्दारे क्रिकेटमध्ये सर्व स्तरावरच्या गुणवान खेळाडूंना संधी मिळण्याचे प्रयत्न कोंडे साहेबांनी केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मुदूला महाजन यांनी केले. मानपत्राचे वाचन संजय शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल यांनी केले. आभार डॉ. दिलीपसिंह मोहीते यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरूण जागडे, आनंद नायडू मुकेश गुजराती, अविनाश देव, एन. डी. कदम, ऐश्वर्या साठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




















Join Our Whatsapp Group