पिंपरी (Pclive7.com):- मावळ तालुक्यातील बेबडोहळ येथील पवनानदी पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांनी पुलाखाली मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, मृतदेह ज्या परिस्थितीत आढळून आला आहे, त्यावरून नागरिकांकडून खुनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
शिरगाव परंदवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूबाबत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.




















Join Our Whatsapp Group