पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी येथील विषारी दारुकांडातील मृतांचा आकडा वाढतच असून आणखी एका २७ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित तरुण गेल्या चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, आज त्याची प्राणज्योत मालवली.

या मृत्यूनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणातील एकूण मृतांची संख्या २५ वर पोहोचली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आणखी चार जणांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विषारी दारुकांड प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




















Join Our Whatsapp Group