पिंपरी (Pclive7.com):- व्हॅलेंटाईन डेच्या उत्सवी वातावरणात शहरातील आकुर्डी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून २३ वर्षीय तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील समर्थ संजय माळी हा तरुण काही दिवसांपासून आकुर्डी येथील गुरुद्वारा कॉलनी परिसरात मित्रांसोबत वास्तव्यास होता. दुपारच्या सुमारास मित्र जेवणासाठी बाहेर गेले असताना तो एकटाच खोलीत होता. त्याच वेळी त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मित्र परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर चिंचवड पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा व पुढील प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्रेमसंबंधातून नैराश्य आल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा परिसरात असली तरी पोलिसांकडून अद्याप अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे.























Join Our Whatsapp Group