पिंपरी (Pclive7.com):- वयोवृद्ध महिला व पुरुषांना पोलीस असल्याचे भासवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हातचलाखीने काढून फसवणूक करणाऱ्या रेकॉर्डवरील इराणी आरोपीस गुन्हे शाखा, युनिट दोनच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील इराणी वस्ती, अंबिवली येथून ताब्यात घेतले.

मोहम्मद सय्यद कंबर अली (वय ४०, रा. स्टार बेकरी जवळ, इराणी वस्ती, अंबिवली, ठाणे) यास १३ फेब्रुवारी रोजी सापळा रचून पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व त्याचे साथीदार वयोवृद्धांना रस्त्यात अडवून १पोलीस तपास असल्याचे सांगत दागिन्यांची बतावणी करीत असत सुमारे १०० ते १२० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. अटकेदरम्यान नातेवाइकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने धाडसाने कारवाई पूर्ण केली.

आरोपीवर हिंजवडी व देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पुढील तपास गुन्हे शाखा, युनिट-२ करीत आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त आयुक्त बसवराज तेली, सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने केली.






















Join Our Whatsapp Group