भोसरी (Pclive7.com):- भोसरी येथील नव महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त गुरुवार दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, लांडेवाडी येथे भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते सायं. ५ वाजेपर्यंत हे शिबिर सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या शिबिराचे आयोजन नगरसेवक विराज लांडे व माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांनी केले आहे.

या शिबिरात मोफत डोळे तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक व जनरल शस्त्रक्रिया, महिलांच्या स्तनाची कर्करोग तपासणी, दंतरोग तपासणी, किमोथेरपी व रेडिएशन संदर्भातील मार्गदर्शन, कान-नाक-घसा तपासणी व शस्त्रक्रिया तसेच मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि ईसीजी तपासणीही मोफत केली जाणार असून आवश्यक शस्त्रक्रिया अत्यल्प दरात करून देण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये विशेष वैद्यकीय तज्ज्ञांकडून सल्ला व मार्गदर्शन देण्यात येणार असून रक्तदान शिबिराद्वारे गरजू रुग्णांना मदत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या उपक्रमासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक माजी नगरसेवक विक्रांत लांडे व नगरसेवक विराज लांडे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group