पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी प्रभाग क्र. २१ मधील विविध परिसरांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा दाब अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः उंच भागावर व जलवाहिनीच्या शेवटच्या टोकावर असलेल्या घरांमध्ये पाणी पोहोचत नसल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पाणीपुरवठा विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कमी दाबामुळे उंचावरील घरांमध्ये पाणी चढत नाही, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि वारंवार तोंडी तक्रारी करूनही समस्येचे कायमस्वरूपी निवारण झालेले नाही.

या समस्येवर तांत्रिक उपाय म्हणून संबंधित ठिकाणी मोठ्या क्षमतेचा ‘बुस्टर पंप’ बसवण्यात यावा, जेणेकरून शेवटच्या घरांपर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचू शकेल, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने कारवाई करून पाणीपुरवठ्याची समस्या मार्गी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.






















Join Our Whatsapp Group