पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव परिसरातील डांगे चौकात भरदिवसा खुलेआम जुगार अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराशेजारी असलेल्या फुटपाथवर काही व्यक्ती राजरोसपणे जुगार खेळताना दिसत आहेत.

डांगे चौक हा शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असून येथे नागरिकांची सतत ये-जा असते. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या जुगार खेळला जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. संबंधित प्रकारामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी नियमितपणे जुगार खेळला जात आहे. यामुळे तरुणांवर वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकाराबाबत पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. भर चौकात उघडपणे सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकाराकडे पोलीस नेमके काय करीत आहेत, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, पोलिसांकडून कारवाई होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.




















Join Our Whatsapp Group