पिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवीभाऊ लांडगे यांचा सोमवारी (दि.२३) पिंपरी येथे सत्कार करण्यात आला.

सत्कारासाठी बुके किंवा इतर भेटवस्तू न देता पुस्तके व वह्यांचे संच द्यावेत, असे महापौरांनी सोशल मीडियावर आवाहन केले होते. त्यानुसार, दिशा सोशल फाऊंडेशनचे माजी कार्याध्यक्ष सचिन साठे आणि संचालक ॲड. अविनाश ववले यांच्या हस्ते वह्या व शालोपयोगी वस्तू देऊन महापौरांचा सत्कार करण्यात आला. तसेच युवा उद्योजक शिवराज काटे यांचा देखील सन्मान कार्याध्यक्ष राजेंद्र करपे यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, दिशा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, संचालक गणेश लंगोटे, राजेश सावंत, शरीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार कांबळे यांनी केले, तर उपाध्यक्ष संतोष बाबर यांनी उपस्थितांचे आभार मानले.




















Join Our Whatsapp Group