पिंपरी (Pclive7.com):- सोसायटीच्या ‘ड्राइव्ह वे’ मध्ये कचरा टाकू नका असे सांगितल्याच्या रागातून दोन जणांनी एका रहिवाशाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवार (दि.१२) रात्री साडेनऊच्या सुमारास यशदा सुप्रीम सोसायटी, डुडुळगाव येथे घडली.

याबाबत अक्षय अरुण मोरे (३४, रा. डुडुळगाव. मूळ – तणपुरवाडी, पाथर्डी, अहिल्यानगर) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिलीप वाढेकर (रा. डुडुळगाव) आणि त्यांचा मुलगा शुभम दिलीप वाढेकर (रा. डुडुळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सोसायटीतील कचऱ्याच्या डब्यातील कचरा ‘ड्राइव्ह वे’ मध्ये फेकत होते. फिर्यादीने त्यांना तसे न करण्याबाबत हटकले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत खांद्यावर, पाठीत आणि हातावर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या हाताचे बोट फॅक्चर झाले आहे. दिघी पोलिस तपास करत आहेत.




















Join Our Whatsapp Group