पिंपरी (Pclive7.com):- वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कौशल्यपूर्ण उपचार पद्धतीसह माणुसकीची जपणूक करत रुग्णांच्या मनात विश्वास निर्माण करणारे केअर क्युब कॅन्सर सेंटरचे डायरेक्टर डॉ. राम पाटील यांचा ‘अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन’ (AMS), पुणे यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

“यश केवळ पदव्यांनी मिळत नाही, तर ते रुग्णांच्या डोळ्यांतील समाधानाने मिळते,” या विचारांची प्रचिती डॉ. पाटील यांनी आपल्या सेवाभावी कार्यातून दिली आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक उपचार आणि मानसिक आधार देत त्यांनी अनेक कुटुंबांना आशेचा किरण दिला आहे. त्यांच्या या निस्वार्थ रुग्णसेवेची दखल घेत फाउंडेशनच्या वतीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
याच कार्यक्रमात फाउंडेशनच्या वतीने कॅबिनेट मंत्री भरणे (मामा) यांच्या पत्नी सौ. सारिकाताई दत्तात्रय भरणे (मामी) यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. त्यांनाही शिवप्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. या भेटीदरम्यान ‘अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन’च्या विविध सामाजिक उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली.

सौ. सारिकाताई भरणे यांनी फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक करत समाजातील गरजू घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना भविष्यात पूर्ण सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास फाउंडेशनचे पदाधिकारी निलेश काळे, राहुल पवार, पूनम दाबेकर, संदीप निकम, वसंतराव पाटील तसेच शिवप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी आणि आरोग्यसेवेची सांगड घालत अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




















Join Our Whatsapp Group