पिंपरी (Pclive7.com):- शहरातील काळेवाडी परिसरात अंमली पदार्थविरोधी कारवाई करत पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून २ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई (दि.२५) रोजी रागा हॉटेलसमोर, हॉटेल पाटीलवाडा कडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर करण्यात आली.

या प्रकरणी रवि पवार, पोलीस शिपाई (गुन्हे शाखा युनिट २, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रतीक राकेश खैरनार (वय २७, रा. हिंगवडी), मयूर धनश्याम कपाटे (वय २५, रा. अशोकनगर, पिंपरी) आणि अक्षय विजय मंधान (वय २८, रा. पिंपरी गाव) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतीक खैरनार याच्या ताब्यातून ९३ ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ₹४,५५०), आरोपी मयूर कपाटे याच्याकडून ३.३० ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ₹३०,३००) तसेच आरोपी अक्षय बंधान याच्याकडून २३.४० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (किंमत अंदाजे ₹२,३०,४००) असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण जप्त अंमली पदार्थांची किंमत अंदाजे ₹२,६५,३५० इतकी आहे.

आरोपी अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधितांवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नलावडे करत आहेत.


















Join Our Whatsapp Group