पिंपरी (Pclive7.com):- पैशांच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) रात्री अकरा वाजता लकी बेकरी चौक, काळेवाडी येथे घडली.

हाशिम सईद राईन (२४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अरबाज सईद राईन (२२, विजयनगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सद्दाम मो. मुमताज राईन (३४, कापसे चाळ, विजयनगर, काळेवाडी) आणि मो. शरीफ वली खान ऊर्फ जर्सी पठाण (३०, कापसे चाळ, विजयनगर काळेवाडी) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरबाज त्यांचा चुलत भाऊ हाशिम राईन हे जेवण करून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. जुन्या पैशांच्या व्यवहारावरून आरोपींनी ‘आज पैसे दिले नाही तर याला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, आरोपीने चाकू काढून फिर्यादीच्या डोळ्यावर वार केला. भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या हाशिम यांच्या छातीत आरोपीने चाकू खुपसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


















Join Our Whatsapp Group