पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर येथे सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कामातून ओळख निर्माण केलेले ॲड. दिपक नागरगोजे हे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे व स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १६ वर्षांपासून पक्ष सत्तेत नसतानाही त्यांनी सातत्याने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम केले आहे. बूथ पातळीपासून ते प्रभाग स्तरापर्यंत कार्यकर्त्यांना जोडून ठेवणे, पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवणे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असतात.

कोरोना महामारीच्या कठीण काळात ॲड. नागरगोजे यांनी कोणताही राजकीय गाजावाजा न करता गरजू नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप केले. आरोग्य हीच खरी संपत्ती या विचारातून त्यांनी अनेक वर्षांपासून मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले असून, यामधून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पर्यावरण संवर्धनाचा विचार करत दरवर्षी वृक्षारोपण उपक्रम राबवून त्यांनी “हरित प्रभाग” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सन्मान, मार्गदर्शन कार्यक्रम तसेच सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन दरवर्षी रोजगार मेळावे आयोजित करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. यामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
पक्षाच्या आंदोलनांमध्ये सहभागी होताना त्यांनी अनेकदा गुन्हे अंगावर घेतले असून, ही त्यांची पक्षनिष्ठा अधोरेखित करते. झोपडपट्टी भागातील व्यसनाधीन व बेरोजगार तरुणांना योग्य मार्गावर आणण्यासाठी समुपदेशन, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि समाजोपयोगी उपक्रमांत सहभागी करून घेणे, हे काम त्यांनी सातत्याने केले आहे. या सर्व सामाजिक आणि पक्षनिष्ठ कार्याची दखल घेऊन आगामी काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून ॲड. दिपक नागरगोजे यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



















Join Our Whatsapp Group