पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर निवडणूकीत भाजपाचे सचिन चिंचवडे विजयी झाले आहे आहेत. सचिन चिंचवडे यांना ७९ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांना ३२ मते मिळाली. सचिन चिंचवडे ४७ मतांच्या फरकाने विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या विनया तापकीर पराभूत झाल्या आहेत. दरम्यान शिवसेना आणि मनसे तटस्थ राहिली. तर अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केले.
उपमहापौरपदासाठी भाजपकडून सचिन चिंचवडे यांनी तर राष्ट्रवादीकडून विनया तापकीर यांनी उमेदवारी दाखल केली होती.
उपमहापौर पदासाठी झालेले मतदान..
भाजप – ७९
राष्ट्रवादी – ३२
निकाल – भाजपाचे सचिन ४७ मतांनी विजयी.
या निवडणुकीसाठी पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हि विशेष सभा पार पडली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. मात्र राष्ट्रवादीने भाजपाची विनंती धुडकावून लावत ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही.






















Join Our Whatsapp Group