पिंपळे सौदागर (Pclive7.com):- संसारामध्ये पुरुषांचा विश्वास आणि पाठिंबा असली की, त्या बळावरच महिला समाजामध्ये प्रगती करु शकतात असे प्रतिपादन डॉ. धनश्री सोनवणे यांनी केले. पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या वतीने आयोजित महिला दिनानिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शनिवार दि.१४ रोजी स्व. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रभागातील भाजपाच्या नगरसेविका डॉ. कुंदा भिसे, अनिता काटे, सुप्रसिद्ध लेखिका, कवियत्री गीतांजली जोशी, गायिका, गीतकार आणि संगीतकार भारती न्यायाधीश, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरोळ तसेच पी. के. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ. धनश्री सोनवणे यांचा शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रृघ्न बापू काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक संदिप काटे, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार, सचिव सखाराम ढाकणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शकुंतला शिंदे यांनी केले. महिला दिनानिमित्ताने विवेकानंद लिगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला कासार यांनी केले तर भामिनी महाले यांनी आभार मानले. रेखा येळंमकर यांनी कविता सादर केली. सुरेखा पाटील यांनी महिला गीत गायले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोभा राजगुरे, विमल मोंढेकर, अशोक येळंमकर, सुभाष विधाते, रमेश चांडगे, अशोक कलाल आदि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.






















Join Our Whatsapp Group