चिंचवड (Pclive7.com):- चिंचवडगाव येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा आज रविवार दि.१५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे.
हा पालखी सोहळा श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, चिंचवडगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून चिंचवड परिसरातील स्वामी भक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ मंदिर (शुभम लॉन्स समोर) येथून सुरू होऊन चिंचवडगावातून विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. या मिरवणुकीचा मार्ग रिक्शा स्टँड चौक, जुना जकात नाका, क्रांतीवीर चापेकर चौक, गांधी पेठ, ज्ञानेश्वर मित्र मंडळ (चिंचवडचा राजा), श्री राम मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री काळभैरवनाथ मंदिर, मंगलमूर्ती वाडा, श्री धनेश्वर मंदिर, श्री मोरया गोसावी मंदिर असा असणार असून पुन्हा श्री स्वामी समर्थ मंदिर येथे पालखीची सांगता होणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन शुभम गजाननभाऊ चिंचवडे आणि गजाननभाऊ द. चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group