पिंपरी (Pclive7.com):- लग्नाचे आमिष दाखवून ओळख वाढवत विश्वास संपादन करत महिलेची तब्बल ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील दळवीनगर परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी जयेश पाटील उर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे याच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने शादी डॉट कॉम या मोबाईल ॲपवरून फिर्यादी महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला. पुढे विविध कारणे सांगत फिर्यादींना कर्ज काढण्यास भाग पाडले आणि वेळोवेळी पैसे घेतले.
या प्रकारात आरोपीने फिर्यादींकडून एकूण ३१ लाख २० हजार २५७ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर फिर्यादींनी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा पुढील तपास चिंचवड पोलिसांकडून सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group