पिंपरी (Pclive7.com):- जाधववाडी चिखली येथील वुडस् व्हीला सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांची शालेय साहित्याने तुला करण्यात आली. महापौरपदी निवड झाल्यावर राहुल जाधव यांनी सदिच्छा देताना पुष्पगुच्छ न देता वह्या, पुस्तके असे शालेय उपयोगी साहित्य द्यावे, म्हणजे सदर शालेय साहित्य शाळेतील होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना देता येईल, असे आवाहन केले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या शालेय साहित्याची तुला करून आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेमधील आदिवासी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार महेश लांडगे, सोसायटीचे चेअरमन डॉ.प्रमोद कुबडे, सचिव अजित वाडकर, खजिनदार संदीप उमक, उपाध्यक्ष प्रशांत नायर, भाऊराव पांडे, अतुल बोराटे आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group