पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथील ५६ वर्षीय वृध्दाचा स्वाईन फ्ल्यूने उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात स्वाईन फ्लूचा या वर्षातला पाचवा बळी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या वृध्दाला चिंचवड येथील एका खाजगी रूग्णालयात १६ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. दि.१७ रोजी त्या रूग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या रूग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र दि.२४ रोजी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
जानेवारीपासून शहरातील विविध रूग्णालयात ८ लाख २५५ लोकांनी तपासणी केली. त्यापैकी ३८५३ जणांना टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. तर २९ रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. तर ५ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान ३ रूग्णांवर शहरातील विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.