पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे बाळाच्या संदर्भात खोटे ‘रिपोर्ट’ दिल्याप्रकरणी संबंधीत डॉक्टर व सोनोग्राफी सेंटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांची तक्रार व ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल भाऊसाहेब घोडके (वय-२९, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार चिखली येथील अश्वमेध नर्सिंग होमचे डॉ. प्रदीप पंडीत गिरीगोसावी, डॉ. दिपाली प्रदीप गिरीगोसावी, आशिर्वाद डाग्नोस्टिक सेंटरचे डॉ. हर्षद आदिक व डॉ.आशिष अडसुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल यांच्या पत्नी सिमा घोडके यांची चिंचवड येथील आशिर्वाद डाग्नोसिस्ट सेंटर येथे सोनोग्राफी करण्यात आली. यावेळी हलगर्जीपणातून बाळ हे अपंग असताना देखील डॉ. हर्षद आदिक व डॉ.आशिष अडसुळ यांनी त्याबद्दल घोडके दाम्पत्याला कोणतीच माहिती दिली नाही व बाळ सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र दिले. याप्रकरणी डॉ. गिरीगोसावी यांनीही कोणतीच शहानिशा न करता सोनोग्राफी रिपोर्टवरुन पुढील उपचार केले. मात्र बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या डाव्या पंजाला तीन बोटे नाहीत, हाताचा डावा पंजा अर्धवट असून हात पूर्णपणे अपंग आहे. तसेच बाळाला शौच करण्याची जागा नाही. त्यामुळे बाळाच्या जिविताला धोका झाला आहे. याचा अहवाल पुण्यातील ससून रुग्णालयानेही दिला आहे. त्यानुसार निगडी पोलीस ठाण्यात बाळाच्या जिविताला धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.





















Join Our Whatsapp Group