शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि आमदार शंकर जगताप यांची प्रमुख उपस्थिती; युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
पिंपरी (Pclive7.com):- भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मासिक बैठक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३९ व्या भागाचे सामूहिक श्रवण पिंपळे सौदागर येथील आतिथ्य एवेन्यू सोसायटीमध्ये उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीयांशी साधलेला संवाद, राष्ट्रहिताचे विचार आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला संदेश उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे ऐकला. युवकांमध्ये राष्ट्रसेवेची भावना दृढ करणे, समाजहिताच्या कार्यासाठी प्रेरणा मिळविणे आणि केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

संघटनात्मक कामकाजावर चर्चा
यावेळी भाजपा युवा मोर्चाच्या मासिक बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. युवकांचा संघटनेतील सहभाग वाढविणे, आगामी उपक्रमांचे नियोजन आणि पक्षाचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनुसार राष्ट्रसेवा आणि समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार उपस्थित युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे संयोजन सरचिटणीस दिनेश काटे पाटील, उपाध्यक्ष गौरव शिरुडे आणि सचिव गोपाल मंडल यांनी केले. यावेळी भाजपा शहर सरचिटणीस मधुकर बच्चे, भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तेजस्विनी दुर्गे, भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव, युवा मोर्चाचे माजी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा प्रभारी अजित कुलथे, सरचिटणीस प्रसाद कस्पटे, साची दोशी, राजेश डोंगरे, जयनाथ काटे, संदेश काटे पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश वाळुंज, उपाध्यक्ष अमित देशमुख, मनोज घोडेकर, दयानंद बंडगर, विशाल वाघेरे, आदर्श उपाध्याय, सचिव आदम मुलानी, निखिल शहाणे, जगदीश येवले, जालिंदर काटे, रोहित कराळे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप नाईक, मंडल अध्यक्ष ऋषिकेश भालेकर, प्रदीप पवार, रोजगार व स्वयंरोजगार शहर संयोजक नितीन साळी, महिला संयोजिका योगिता जाधव, उद्योग आघाडी शहर संयोजक आदित्य कुलकर्णी, युवती विभाग सहसंयोजिका तेजल कांबळे, विद्यार्थी विभागाचे हर्ष कुंजीर, गौरव शिंदे, हेमंत वर्मा, गौरव बनसोडे, रवींद्र गायकवाड, आदित्य राजे, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे उमाकांत लिंगाडे, नीलम कौशल, श्रीधर महाले, उद्योग आघाडीचे दिपराज गुप्ता, अजय बामणे, अभिषेक बामणे, महेश धनलोभे, दिवाकर महाजन आणि रोहित बिरादार यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सरचिटणीस दिनेश काटे पाटील यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. राष्ट्रसेवा, संघटन बळकटीकरण आणि युवकांचा सक्रिय सहभाग या उद्देशाने भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
Tags: dinesh yadav


















Join Our Whatsapp Group