वाकड (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात जिंजर हॉटेलसमोर अननसाने भरलेला मालवाहू ट्रक उलटल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, हजारो अननस रस्त्यावर विखुरले. मात्र, अपघातानंतर मदतीसाठी पुढे येण्याऐवजी रस्त्यावर पडलेले अननस गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. या प्रकारामुळे नागरिकांच्या सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाकड येथील जिंजर हॉटेलसमोर अननसाने भरलेला मालवाहू ट्रक अचानक उलटला. या दुर्घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले, तर ट्रकमधील हजारो अननस रस्त्यावर विखुरले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली.

या वेळी काही संवेदनशील नागरिकांनी पुढाकार घेत चालकाला आणि जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे अनेक नागरिकांनी रस्त्यावर पडलेले अननस गोळा करून नेण्यासाठी गर्दी केली. दुसऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असताना, त्यातून स्वतःचा फायदा मिळविण्याची ही मानसिकता पाहून उपस्थितांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

अपघातग्रस्तांना मदत की दुसऱ्याच्या नुकसानीत संधी?
अपघातासारख्या आपत्कालीन परिस्थितीत सर्वप्रथम जखमींना मदत करणे, चालकाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य करणे अपेक्षित असते. मात्र, या घटनेत काही नागरिकांनी मदतीचा हात दिला, तर अनेकांनी रस्त्यावर विखुरलेल्या अननसांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.


















Join Our Whatsapp Group