अंतिम सामन्यात स्टॉर्म वॉरियर्सचा पराभव; २.४ षटकांत लक्ष्य गाठत पटकावले विजेतेपद
वाकड (Pclive7.com):- यशवीन सुपरनोव्हा (YSN) चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन १ स्पर्धेत ग्रॅव्हिटी टायटन्स संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. शनिवारी (दि.२४ ऑक्टोबर) वाकड येथील भूमकर चौकातील कार्तिक कलाटे स्पोर्ट्स अकादमी येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. अंतिम सामन्यात ग्रॅव्हिटी टायटन्सने स्टॉर्म वॉरियर्सवर पाच विकेट्स राखून मात केली.

या स्पर्धेत ब्रदरहुड सेव्हन, ग्रॅव्हिटी टायटन्स, स्टॉर्म वॉरियर्स, थंडरबोल्ट, रॉयल टायगर्स आणि सुपरनोव्हा युनायटेड या सहा संघांनी सहभाग घेतला.

स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना रॉयल टायगर्स आणि ग्रॅव्हिटी टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात ग्रॅव्हिटी टायटन्सने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्टॉर्म वॉरियर्सने ब्रदरहुड सेव्हनवर मात करत अंतिम सामन्यात धडक मारली.

अंतिम सामन्यात स्टॉर्म वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करत ग्रॅव्हिटी टायटन्ससमोर ४५ धावांचे लक्ष्य ठेवले. हे आव्हान स्वीकारताना ग्रॅव्हिटी टायटन्सने आक्रमक फलंदाजी केली. अवघ्या २.४ षटकांत पाच विकेट्स राखून लक्ष्य पूर्ण करत संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी YSN क्रीडा समितीने विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेमुळे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.


















Join Our Whatsapp Group