
पिंपरी (चंद्रशेखर कुदळे):- NIDJAM (राष्ट्रीय आंतरजिल्हा कनिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा) निवड चाचण्यांचा उद्घाटन समारंभ युवा खेळाडूंच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि उत्साहात पार पडला. या निवड चाचण्यांमध्ये १४ आणि १६ वर्षांखालील वयोगटातील सुमारे २५० मुला-मुलींनी सहभाग घेत आपले क्रीडा कौशल्य, जिद्द आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले.

या उद्घाटन समारंभाला जिजामाता पुरस्कारप्राप्त तथा PDAAAच्या उपाध्यक्षा गुरुबन्स कौर, PDAAAचे प्रभारी सचिव चंद्रकांत पाटील, सहसचिव विजय बेंगळे, तांत्रिक अधिकारी अभय पोतदार आणि किरण उतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या निवड चाचण्यांमुळे युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची आणि आगामी राष्ट्रीय आंतरजिल्हा कनिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड होण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा १४ ते १६ नोव्हेंबर २०२६ दरम्यान तेलंगणा येथे आयोजित करण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया PDAAAच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष वैभव पायगुडे यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. सहभागी खेळाडूंचे कौशल्य आणि कामगिरी यांचे पद्धतशीर व निष्पक्ष मूल्यमापन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी योग्य खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
या स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या ॲथलेटिक्समधील पुढील वाटचालीसाठी ही निवड चाचणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे..




















Join Our Whatsapp Group