शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्याकडून मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळा किवळे क्र.९६ या शाळेला ISO 9001:2015 (Quality Management System) मानांकन प्राप्त झाले असून शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची अधिकृत दखल घेण्यात आली आहे. या यशाबद्दल शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.

Vitsin World Services Private Limited या संस्थेमार्फत शाळेचे मूल्यमापन करण्यात आले. गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी, शिस्तबद्ध नियोजन, परिणामकारक अध्यापन पद्धती, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम या बाबींमध्ये शाळेने उच्च दर्जा राखल्याचे या मानांकनातून सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमानुसार प्रभावीपणे प्राथमिक शिक्षण राबवण्यात शाळा यशस्वी ठरली असून ही बाब अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या यशामागे ‘ब’ प्रभागाच्या पर्यवेक्षिका सौ. सरस्वती भेगडे, प्रभारी मुख्याध्यापक बाबासाहेब आव्हाड तसेच शिक्षकवृंद—रेखा गादेकर, वृषाली मुंढे, विनायक शिरतर, मृणाल शिंदे, अर्चना साळुंखे, संपदा काळे, श्रुती मरकड, नेताजी घोलप, विजय ढवळे, सुभाष नलावडे यांचे परिश्रम मोलाचे ठरले आहेत. तसेच कर्मचारी वर्गाचे सहकार्य, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा विश्वास याचाही मोठा वाटा आहे. हे ISO प्रमाणपत्र शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यक्त केला आहे. भविष्यातही शाळा अशीच प्रगती करत गुणवत्तेचा उच्चांक गाठेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
या यशाबद्दल नगरसेवक निलेश तरस, नगरसेविका ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे आणि नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले.






















Join Our Whatsapp Group