पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने २३ वा बळी घेतला आहे. उस्मानाबाद येथील ६० वर्षीय महिलेचा थेरगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद येथील ६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यापासून या भयानक आजाराने मोठ्या प्रमाणात आपला विळखा आवळला असून या वर्षात तब्बल २३ रूग्णांचे बळी घेतले आहेत. दरम्यान आज शहरातील विविध रूग्णालयात ३१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ८ रूग्ण अतिदक्षता विभागात मृत्यूशी लढत आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद येथील ६० वर्षीय महिलेला दि.१४ सप्टेंबर रोजी थेरगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती खालावली. अखेर उपचारा दरम्यान आज त्या महिलेचा मृत्यू झाला असून जानेवारीपासून बळींची संख्या २३ वर पोहचली आहे.
गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने आपला विळखा चांगलाच आवळला आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन शहरवासियांना करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group