पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व व निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती युवकचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र बनसोडे यांनी दिली. ‘गांधीवाद आणि आजचा तरुण’, ‘मोहनदास ते महात्मा’ (एक असाधारण आणि अपंरपरागत प्रवास) आणि ‘गांधीजींचे विचार जीवनात उतरविण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न’ हे वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत. तर, ‘गांधीजी मला भेटले’, ‘गांधीजी जे मला समजले’, ‘गांधीवाद वैश्विक शांतते सर्वोत्तम पर्याय’, ‘असहकार आणि छोडो भारत’ या संकल्पनांची आज आवश्यकता आहे का ? हे निंबध स्पर्धेचे विषय आहेत.
दोन्ही स्पर्धांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजर्नाथ परितोषिके व स्मृती चिन्हे देण्यात येणार आहे. या स्पर्धा माध्यमिक, कनिष्ठ महविद्यालयीन व पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्या-या विद्यार्थ्यांसाठी आहेत. निबंध जमा करण्याची अंतिम तारिख १० ऑक्टोबर असून निबंध आप- आपल्या महाविद्यालयांमध्ये जमा करावे. वक्तृत्व व स्पर्धेबाबत अधिक माहिती व नावनोंदणी साठी ९८६०१७७१७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group