पिंपरी (Pclive7.com):- जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत पिंपळे सौदागर, रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनेल प्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पॅनेलसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला.

पिंपळे सौदागर येथील हॉटेल व्यावसायिक व नाना काटे यांचे खंदे समर्थक संतोष मल्हारी काटे (महाराज) यांनी सक्रिय कार्यकर्त्यांसाठी नवीन बुलेट दुचाकी बक्षीस जाहीर केले होते. प्रभागातील सुमारे ३०० सक्रिय कार्यकर्त्यांमधून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर “नाना काटे मित्र परिवार” यांच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आला.

या लकी ड्रॉमध्ये प्रभागातील कार्यकर्ते सचिन ढेपे हे भाग्यवान ठरले. त्यांना नवीन कोरी बुलेट दुचाकी बक्षीस मिळाले. यावेळी नाना काटे मित्र परिवाराच्या हस्ते सचिन ढेपे यांचा सत्कार करून गाडीची चावी प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





















Join Our Whatsapp Group