भोसरी (Pclive7.com):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2026 निमित्त संघर्ष प्रतिष्ठाणच्या अध्यक्षपदी आयु. सिद्धांत बाळू डोळस यांची निवड करण्यात आली आहे. भोसरी येथे आयोजित बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

या बैठकीस संघर्ष प्रतिष्ठाणचे माजी अध्यक्ष मनोज डोळस यांच्यासह विजय ढमढेरे, प्रतिक डोळस, राहुल शिंदे, मिथिलेश कांबळे, राज सोनवणे, तनिष झेंडे, निखिल ओव्हाळ, अक्षय शिंदे, रोहित डोळस, रोहित माने, अविनाश ओव्हाळ, प्रितम डोळस, अविनाश चव्हाण, निथिलेश डोळस, ऋषिकेश ओव्हाळ, रुपेश आपटे आदींसह सर्व सभासद उपस्थित होते.

नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सिद्धांत डोळस यांनी आभार व्यक्त करत यंदाचा जयंती महोत्सव अधिक उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सामाजिक एकोपा आणि युवकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी मांडला.






















Join Our Whatsapp Group