पिंपरी (Pclive7.com):- शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रीपाद वल्लभ पारायण कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी अभिषेक, होम-हवन, महाआरती तसेच भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वामींना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. दिवसभर भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडले. सायंकाळी “स्वरमोहीनी” या भक्ती व भावगीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमांचे नियोजन आणि आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, दीपक बिराजदार, प्रा. हरि नारायण शेळके, राजू गुणवंत, दत्तू बहिरवाडे, स्नेहा गुणवंत, सारिका रिकामे, क्षमा काळे, स्मिता शिरसाट, नीलिमा भंगाळे, ऋषिकेश किरपे, उत्तरेश्वर साबळे आदींनी केले. या उत्सवामुळे शिवतेज नगर परिसरात भक्तीमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.
























Join Our Whatsapp Group