पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई करत चऱ्होली येथे सुमारे २ लाख ४८० रुपयांचा विदेशी दारू साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंद्यांना मोठा आळा बसला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौक परिसरात काही जण अवैधपणे विदेशी दारू साठवून विक्री करत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत रामप्रसाद साहेबराव साळुंखे वय ३३ वर्ष रा.चन्होली (खु) ता. खेड जि. पुणे २) तिलक हेमंत पटेल वय २१ वर्ष रा. वापी नानी तंबाडी ता. पार्डी जि. वलसाड राज्य गुजरात ३) अनिल रामसुरत यादव यय २४ वर्ष रा. चनद कॉलनी वापी ता. पार्डी जि. वलसाड राज्य गुजरात यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून एकुण २० नग खाकी रंगाच्या बॉक्सची व दोन पाढऱ्या रंगाच्या गोणीची बॉटल पाहणी केली असता त्यामध्ये रॉयल चॅलेंज कंपणीचे ०६ बॉक्स, इम्पेरीयल ब्ल्यु कंपणीचे ०८ बॉक्स, व रॉयल स्टॉग कंपणीचे ०६ बॉक्स तसेच दोन पाढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये रॉयल चॅलेंज कंपणीच्या ४०० नग बॉटल व आरोपीचे तीन मोबाईल फोन अशी एकुण २ लाख ४८० रुपये किंमतीची विदेशी दारु व तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असुन त्यांच्या विरुद्ध दिघी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी संतोष कसबे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३ यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस अंमलदार सोमनाथ बोहाडे, सागर सुर्यवंशी, श्रीधन इचके, शशिकात नांगरे, समिर काळे, राजकुमार इघारे व निखील फापाळे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group