पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक २६ वाकड-पिंपळे निलखमध्ये स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विकासकामे चालू वर्षामध्ये करण्यात येणार आहेत. यावेळी अनेक मुलभूत समस्यांवर कायमचा उपाय करण्यासाठी त्यांनी विकासकामांवर जास्त लक्ष दिलेले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्र २६ वाकड-पिंपळे निलखमध्ये होऊ घातलेली अनेक विकासकामे ममता गायकवाड यांनी जाहीर केली.
पाणीप्रश्न –
प्रामुख्याने वाकड-पिंपळे निलख परिसरात पाण्याची समस्या असल्याने यावर कायमचा उपाय म्हणून आता २४x७ अमृत योजने अंतर्गत संपूर्ण प्रभागात नवीन पाईपलाईन नेण्याचे काम चालू झाले आहे. अनेक दिवसांपासून प्रयत्न करून २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. यामुळे वाकड-पिंपळे निलखमधील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.
रस्ते –
वाकड-पिंपळे निलख परिसरातील रस्ते हे सिमेंट काँक्रीट करण्याचे करून अद्ययावत करणे. यामध्ये मॉडेल रोड करून नागरिकांना वाहतुकीसाठी, चालण्यासाठी सुसज्ज असे सिमेंट काँक्रीटचे रस्ते लवकरच होत आहेत. यामध्ये कावेरी सब वे ते पिंक सिटी कॉर्नर पर्यंत डी. पी. रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक पर्यंत रोड रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, विशालनगर वाघजाई हॉटेल पासून ते कास्पटे चौक पर्यंत २४ मी डी पी रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, व वाकड पिंपळे निलख मधील अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रिटचे करणे आशा रस्त्यांच्या विकास या विकासकामां मार्फत हे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणार आहे.
विरंगुळा केंद्र –
ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे असे विरंगुळा केंद्र उपलब्ध नाही याकरिता वाकडमध्ये ज्येष्ठांसाठी प्रशस्त असे विरंगुळा केंद्र या परिसरात उभारण्यात येत आहे.
लिनियर गार्डन –
लहान मुले व नागरिकांना वाकड-पिंपळे निलख मध्ये सुसज्ज असे लिनियर गार्डनच्या धर्तीवर वेणुनगर येथे गार्डन विकसित होत आहे.
स्मशान भूमी –
कस्पटेवस्ती येथील स्मशान भूमी विकसित करून अद्ययावत करण्यात येणार आहे यामध्ये विद्युत दाहिनी सुद्धा असणार आहे तसेच पर्यावरणपूरक व नागरिकांना धुराचा त्रास होऊ नये म्हणून योग्य टे आउटलेट्स असणार आहेत.
अशी अनेक विकासकामे वाकड पिंपळे निलख मधील नागरिकांना दिवाळीची भेट म्हणून देत आहोत. यापुढेही अनेक चांगल्या प्रकारची विकासकामे या परिसरातील नागरिकांना अनुभवायला मिळतील असा विश्वास स्थायी सभापती ममता गायकवाड यांनी व्यक्त केला.