पुणे (Pclive7.com):- पुणे शहरात आज एकाच दिवसात तीन ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत चंदननगर परिसरात एका महिलेवर गोळी झाडण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत येवलेवाडी परिसरातील एका सराफा व्यावसायिकावर गोळीबार झाला. तिसऱ्यांदा गोळीबार झाल्याची घटना पुणे रेल्वे स्थानकावर घडली. चंदननगर परिसरातील गोळीबार करणाऱ्या आरोपीला पकडायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर गोळी झाडण्यात आली आहे.
चंदननगर गोळीबारातील आरोपी झेलम एक्सप्रेसने पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गजानन पवार यांच्यावर आरोपीने ३ गोळ्या झाडल्या. यातील २ गोळ्या पवार यांना पोटात लागल्या. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना ५.१५ च्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर घडली.