या भागात रोजगार उपलब्ध होत नव्हता आम्ही सर्वांनी ७२ सालचा दुष्काळ अनुभवला आहे. सुकडी खाऊन आम्ही दिवस काढले आहे मात्र आता हे चित्र बदलले आहे हा बदल शरद पवारांमळे शक्य झाला आहे. त्यामुळे या उपकारांची परतफेड आम्हाला करायची त्यासाठी रोहित पवारांना शिरुर लोकसभेची उमेदवारी द्या असे आवाहन कार्यकर्त्यांच्या साक्षीने माजी आमदार मोहितेंनी यावेळी केले.
लोकसभा तोंडावर येत असताना शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव यांच्या समोर थेट लढत देण्यासाठी राष्ट्रवादी उमेदवार अजुनही जाहीर करत नाही. त्यातुन युवक मेळाव्यात पवारांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी युवा नेतृत्व रोहित पवारांना उमेदवारी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीला तरुणांसह कार्यकर्त्यांनी हात वर करुन प्रतिसाद दिला.