जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक सुरू आहे. याठिकाणी अनिल गोटे आले असता, त्यांनी या बैठकीबाबत माहिती नसल्याचे सांगितले. तसेच आपण लोकप्रतिनिधींच्या बैठकीला येणार आहोत. मात्र, आधी पोलिसांची बैठक होऊन जाऊ द्या, त्या बैठकीत पैसे कसे खावे, याचे प्रशिक्षण दिले जात आहे, अशी टीका गोटे यांनी यावेळी केली.