पिंपरी (Pclive7.com):- भारताला पॅरा ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलेले पिंपरी चिंचवडचे रहिवासी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या प्रकट मुलाखतीचे उद्या रविवारी (दि.३०) पिंपरी येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
पिंपरी चिंचवड कलाप्रेमी मंच व स्वराज ग्रुपच्या वतीने आयोजित पिंपरीतील सायन्स पार्क प्रेक्षागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. निवेदक विजय बोत्रे पाटील हे मुलाखत घेणार आहे. श्री. पेटकर यांच्या जीवनावर नुकताच “चंदू चॅम्पियन” हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, स्वराज्य ग्रुपचे संचालक विजय अण्णा चौधरी, हेमंत खंडागळे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.






















Join Our Whatsapp Group