पिंपरी (Pclive7.com):- क्रीडा क्षेत्रात पिंपरी-चिंचवड शहराची मान उंचावणारी अभिमानास्पद कामगिरी शहरातील दोन युवा खेळाडूंनी केली आहे. इंदूर येथे होणाऱ्या दुसऱ्या ज्युनिअर रोलबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या दिव्या कापसे आणि अनया भिंगे या दोघींची भारतीय संघात निवड झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने दोन्ही खेळाडूंच्या यशाचे शहरभरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या निवडीमुळे पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रोलबॉलसारख्या वेगवान आणि कौशल्यपूर्ण खेळात भारतीय संघात स्थान मिळवणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. दिव्या आणि अनया यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
आता इंदूर येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्यांच्या माध्यमातून भारताला जागतिक स्तरावर यश मिळावे आणि पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जावा, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


















Join Our Whatsapp Group