आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा’
पिंपरी (Pclive7.com):- साकुर्डी गावातील गरजू कुटुंबांना पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकारातून जीवनावश्यक वस्तूंच्या ४०० किटचे वाटप करण्यात आले. भाजपा नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत ही मदत देण्यात आली.

साकुर्डीतील कुटुंबांना रोजच्या वापरासाठी आवश्यक साहित्य मिळावे आणि त्यांच्या घरखर्चाला हातभार लागावा, या उद्देशाने जाधव यांनी वाटपाचे आयोजन केले. महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील गरजू कुटुंबांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला.
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील ५१ आदिवासी व दुष्काळग्रस्त गावांमधील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा संकल्प आहे. त्याअंतर्गत राहुल जाधव यांनी साकुर्डीतील वाटपाची जबाबदारी घेतली.

“राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही साकुर्डीत जीवनावश्यक वस्तूंच्या ४०० किटचे वाटप केले. गावातील कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावता आला, याचे समाधान आहे. ही मदत कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.”
– राहुल जाधव, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड.
– राहुल जाधव, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड.


















Join Our Whatsapp Group