पिंपरी (Pclive7.com):- राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आज, सोमवार (दि.२३ नोव्हेंबर) रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. अधिकृत कार्यक्रमानुसार, सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पिंपरी येथील महापालिका मुख्यालयात आगमन होणार आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या या महापालिका मुख्यालयातील भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीदरम्यान महापालिका प्रशासनाशी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्याकडे महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group