पिंपरी (Pclive7.com):- दि इंस्टीट्यूट ऑफ़ चॅर्टर्ड अकौंटंटस ऑफ़ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने निगडी येथे आलेल्या सुमारे पाचशे वारकऱ्यांना वेदनाशामक मलमचे वाटप करण्यात आले. यावेळी दि इन्स्टिट्यूट ऑफ़ चॅर्टर्ट अकौंटंट ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सीए पंकज पाटणी, उपाध्यक्ष वैभव मोदी, सचिव सारिका चोरडिया, माजी अध्यक्ष सचिन बंसल, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सीए शाखेच्या कार्यालयात मुक्कामासाठी आलेल्या वारकऱ्यांना आर्थिक साक्षरता व ऑनलाईन होणाऱ्या फसवणूक यापासून सावध कसे राहावे याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी व्यक्तींना मोबाईल देवू नका, फोनवर आलेला ओटीपी नंबर सांगू नका. असे मार्गदर्शन अध्यक्ष सीए पंकज पाटणी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिमा भिसे, प्रीती कुलकर्णी, कल्पना शिंदे, आदित्य कांबळे, बाबासाहेब कनके, सीए अजिंक्य हिरन,सुनील मिरचंदानी आणि सीए विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags: आषाढी वारीदि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने वारकऱ्यांना औषधांचे वाटपपिंपरी चिंचवड शाखावारकऱ्यांना औषधांचे वाटप























Join Our Whatsapp Group