पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील जेष्ठ नागरिक संघाचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ७५ वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठांचा सत्कार, मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम यासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच सरस्वतीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास नगरकर, रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार, सागर बिरारी, ऋषिकेश होने, श्रीकांत शिंदे, यांच्यासह परिसरातील सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद उपस्थित होते.
वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेले भास्कर मिस्त्री, ध्रुवकांत भट, मुकुंद द्रविड व लक्ष्मण अय्यर यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त सर्व जेष्ठ नागरिकांनी मराठी व हिंदी गीते म्हणून उपस्थितांची मने जिंकली. तसेच अनेक जेष्ठांनी आपल्या जीवनातील यश-अपयशाच्या अनेक पैलूंना उजाळा दिला.
इंदू सूर्यवंशी व शैला गुजलवार यांनी सूत्रसंचालन केले तर विलास नगरकर यांनी आभार मानले.