पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपाकडून जेष्ठ नगरसेविका माई ढोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलायं. तर उपमहापौरपदी तुषार हिंगे यांनी अर्ज भरला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा माधवी नाईक, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्थायी सभापती विलास मडेगिरी, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उमा खापरे आदी उपस्थित होते