पिंपरी (Pclive7.com):- पिंपळेगुरव येथील आदियाल कुटुंबाने काही दिवसांपूर्वीच घरात झालेल्या निधनाचे दुःख विसरून राजीव गांधीनगर झोपडपट्टी आणि काशिद पार्क, लक्ष्मीनगर येथील कामगारांना अन्नधान्याचे वाटप केले.
पिंपळेगुरव येथील माजी नगरसेविका शोभा आदियाल यांचे पती गुरूमितसिंग आदियाल यांचे २१ मार्च रोजी निधन झाले. आदियाल कुटुंबाच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना बाहेर कोरोना विषाणूमुळे अनेक गोरगरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची जाणीव झालेल्या आदियाल कुटुंबाने राजीव गांधीनगर झोपडपट्टी आणि काशिद पार्क, लक्ष्मीनगर येथील कामगारांच्या दारावर जाऊन अन्नधान्याचे वाटप केले.
सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल, नयन अहिरे, उद्योजक मानसिंग आदियाल, आशिष सोनवणे, अरविंद कसबे, प्रसाद माकर, प्रीतम आदियाल, रोहन शिंदे, धीरज जगताप व कार्यकर्त्यांनी गोरगरीब कामगारांच्या घरोघरी जाऊन त्यांना अन्नधान्याचे वाटप केले.






















Join Our Whatsapp Group