पिंपरी (Pclive7.com):- कोरेनाचा संसर्ग वाढल्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकाने लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे व व्यवसाय ठप्प झाले आहेत. नेहमी नागरिकांच्या प्रवासासाठी रिक्षावाले उपलब्ध असतात. आज त्या रिक्षावाल्याचा व्यवसाय बंद पडला आहे. ह्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला गटातर्फे आज दापोडी येथील रिक्षा चालकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
ह्यावेळेस पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, सौ. शीलामामी जाधव, मा. उपविभाग प्रमुख प्रमोद गायकवाड, मा. शाखाप्रमुख राहुल जाधव, अजित पठाण, अमर शेख, महेश काटे, प्रशांत ढमाले, उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group