पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनची मुदतही ३ मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे हातावरचं पोट असलेल्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आलीयं. म्हणूनच सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पंकज भालेकर यांनी गरजूंना मदतीचा हात दिलायं. तळवडे परिसरातील तब्बल १५०० कुटूंबांना भालेकर यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किराणा साहित्यांचे किट घरपोच केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळवडे प्रभागातील नागरिकांना घरापर्यंत मदत कार्य पोहचविण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर व त्याचे सहकारी जीवाचे रान करत आहेत. ‘समाजकार्यासाठी त्यांनी कंबर कसली असून तळवडे प्रभागातील कानाकोपऱ्यात मदतकार्य पोहोचवले जात आहे. पिंपरी चिंचवड शहर कोरोनामुक्त ठेवायचा हा निर्धार करुन लोकप्रतिनिधींनी ‘मदत नव्हे कर्तव्य’, सोशल डिस्टंसिंगचे पालन करत प्रशासनाला व जनतेला सहकार्य करत आहेत. सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पंकज भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तुंचा संच वाटपाची सुरूवात करण्यात आली. किमान महिनाभर पुरेल इतके किराणा साहित्य गरजू कुटूंबांना देण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group