पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदवस वाढत आहे. चऱ्होली परिसरात कोरोनाचे २ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४० वर पोचली आहे.
शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी (दि. १७) शहरातील दिघी आणि भोसरी परिसरात चार कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आणखी दोघे जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये चऱ्होली येथे राहणारे ४३ वर्षीय पुरुष आणि ३८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सध्या पिंपरी चिंचवड शहरात ३६ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर अन्य ४ जणांवर पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. आत्तापर्यंत १३ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. तर एकाचा यापूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ५४ गेली असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.






















Join Our Whatsapp Group